Breaking News

युवा सेनेचे बाळासाहेब दुतारे यांची उपजिल्हाध्यक्ष पदावरून हकालपट्टी.

पक्षात राहून पक्षाच्या विरोधात कारवाई करणे, तसेच वरिष्ठ नेत्याचे आदेश न पाळता, सातत्याने पक्षाच्या विरोधात काम केल्यामुळे युवा सेनेचे जिल्हा उपाध्यक्ष बाळासाहेब दुपारे यांची नगर जिल्ह्याचे संपर्क प्रमुख भाऊ कोरेगावकर याच्या आदेशाने जिल्हा प्रमुख शशिकांत गाडे यांच्या पत्राद्वारे सेनेमधून हकालपट्टी करण्यात आली आहे.




श्रीगोंदा तालुक्यामध्ये जिल्हा समन्व्यक घनश्याम शेलार यांनी शिवसेनेत प्रवेश केल्यापासून, जुन्या- नव्या कार्यकर्त्यामध्ये अंतर्गत घुसपूस चालूच होती. यामध्ये प्रामुख्याने युवा सेनेचे उपाध्यक्ष बाळासाहेब दुतारे यांना पक्ष श्रेठींनी अनेक वेळा समझोता करण्याचा प्रयत्न केला. 

याबाबत अनेक वेळा त्यांना समजही देण्यात आली होती. मात्र तरीही त्याच्यात कोणताही बदल न झाल्याने उलट दि. ३० नोव्हेंबर रोजी दुतारे यांनी श्रीगोंदा येथे कुकडी हॉल मध्ये निवडक युवा कार्यकर्त्यांचा मेळावा आयोजित करून या मेळाव्यात घनश्याम शेलार हे सेनेचे मावळे नसून स्वार्थी कावळे आहेत. ते फक्त कामापुरते आमचा वापर करतात. तसेच शहरातून मोठ्या प्रमाणात रॅली काढून दलबदलू हटावो शिवसेना बचाओ, अश्या अनेक घोषणा देत शेलार याच्याशी दोन हात करण्याची भाषा केली होती. 

याबाबत अनेक वर्तमान पत्रातून बातम्या झळकल्या नंतर घनश्याम शेलार यांनी हा प्रकार वरिष्ठाच्या कानावर घातला. आणि दुतारे याच्या हकालपट्टी करण्याची मागणी केली. त्यावर वरिष्ठ पातळीवर या प्रकरणाची दखल घेण्यात आली. अहमदनगर जिल्ह्याचे संपर्क प्रमुख भाऊ कोरेगावकर याच्या आदेशाने नगर दक्षिण चे जिल्हा प्रमुख शशिकांत गाडे याच्या सहीने लेखी पत्र देऊन युवा सेनेचे बाळासाहेब दुतारे याची उपजिल्हाध्यक्ष पदावरून हकालपट्टी करण्यात आली आहे.