Breaking News

संत जगनाडे महाराज स्मारकासाठी एक कोटी रुपयांचा निधी देणार


समाजाचे प्रबोधन करणाऱ्या, समाजाला नवी दिशा देणाऱ्या, वाईट चालीरितीवर प्रहार करणाऱ्या तुकाराम महाराजांची गाथा संत जगनाडे महाराजांनी त्यांच्या तल्लखबुद्धीने स्मरण करुन लिहून काढली. त्यांनी समाजाला दिलेली ही मोठीच देणगी आहे. अशा समाज संतांचे उत्कृष्ट स्मारक करण्यासाठी एक कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून देऊ, अशी ग्वाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली.
जगनाडे चौक येथे आयोजित श्री संत संताजी जगनाडे महाराज पुण्यतिथी स्मरण सोहळा कार्यक्रमात श्री.फडणवीस बोलत होते. यावेळी महापौर नंदा जिचकार, खासदार कृपाल तुमाने,आमदार सर्वश्री जोगेंद्र कवाडे, कृष्णाजी खोपडे, सुधाकर कोहळे, माजी मंत्री जयदत्त क्षीरसागर,बाबूलाल वंजारी, स्मारक समितीचे अध्यक्ष बन्सीलाल चौधरी उपस्थित होते.