Breaking News

अश्‍लील चित्रफितीद्वारे ब्लॅकमेल करून महिलेवर वारंवार अत्याचार

सोलापूर, दि. 17, डिसेंबर - एका पोलिसाने त्याच्याच सोसायटीत राहणार्‍या महिलेशी ओळख वाढवत तिच्याशी दुष्कर्म केले. अश्‍लील चित्रफीत तयार करून ब्लॅकमेल करून वारंवार गैरफायदा घेतल्या प्रकरणी विजापूर रस्ता परिसरातील भीमराव ऊर्फ स्वप्नील अरविंद इंगळे (वय 32) याला अटक झाली. न्यायाधीश देशपांडे यांच्यासमोर हजर के ल्यानंतर पाच दिवस पोलीस कोठडी सुनावली.


जुलै 2015 ते डिसेंबर दरम्यान ही घटना घडली. एके दिवशी घरी येऊन दुष्कर्म केले. त्यावेळी अश्‍लील चित्रफीत तयार केली. मग ब्लॅकमेल करीत वारंवार दुष्कर्म करीत होता. 1 डिसेंबर रोजी इंगळे याने पीडितेला पत्रकार भवन येथे रस्त्यावर मारहाण केली. रेल्वे रूळावर नेऊन तुला मारीन म्हणून दमदाटी केली. यामुळे तिने पोलिसात तक्रार दिली.