Breaking News

मुंबई - नागपूर समृद्धी महामार्गावर 31 टोल ?


मुंबई : बहुचर्चित मुंबई - नागपूर समृद्धी महामार्गावर सुमारे 31 टोल असतील, अशी माहिती माहितीच्या अधिकारातून समोर आली आहे. जर हा महामार्ग अस्तित्त्वात आला तर, या रस्त्यावरून प्रवास करणार्‍या नागरिकांना जवळपास 1500 ते 2000 रुपये केवळ टोलसाठी मोजावे लागणार आहेत. महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळ यांच्यामार्फत आरटीआय कार्यकर्ते आणि टोल अभ्यासक संजय शिरोडकर यांनी ही माहिती दिली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि भारतीय जनता पक्षाचे नेते व केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांचा हा ’ड्रीम प्रोजेक्ट’ म्हणून प्रकल्प ओळखला जातो.