Breaking News

त्र्यंबकेश्‍वरला मुक्तहस्ते निधी देण्याचे मुख्यमंञ्यांचे आश्‍वासन

नाशिक/ प्रतिनिधी । 26 :महाराष्ट्राच्या इतिहासात संत श्रेष्ठ श्री निवृत्तीनाथांच्या चरणी लीन होणारे पहिले मुख्यमंञी हा बहुमान पटकावून मुख्यमंञी देवेंद्र फडणवीस यांनी श्री निवृत्तीनाथांना साक्षी ठेवत ञ्यंबकेश्‍वर तिर्थस्थानाला वैश्‍विक दर्जजाचे पर्यटन श्रध्दा स्थळ बनविण्याचे आश्‍वासन दिले. मुख्यमंञ्यांचा हा विधी सुरळीत पार पडला असला तरी मार्गावर संतप्त शेतकर्यांनी दाखवलेले काळे झेंडे या आनंदावर विरजण टाकून गेले.

त्र्यंबकेश्‍वर येथिल संतश्रेष्ठ श्री निवृत्तीनाथ महाराजांच्या संजीवन समिती मंदिराचा नवीन बांधकाम आराखड्यानुसार नुतन बांधकाम करतांना राज्यशासन मंदिरासाठी काहीही कमी पडु देणार नाही येथे येणार्‍या भाविक वारकरी आणि पर्यटकांना सुख-सोई उपलब्ध करुन देण्यासाठी शासन सदैव तत्पर राहील असे आश्‍वासन राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले.

त्र्यंबकेश्‍वर येथे ब्रम्हगीरी पर्वताच्या पायथ्याशी वारकरी अध्वर्यू संतश्रेष्ठ श्री निवृत्तीनाथ महाराजांची संजीवन समाधीस्थान आहे या ठिकाणी श्री निवृतीनाथ महाराज समाधी संस्थान ट्रस्टच्यावतीने श्री निवृतीनाथ महाराजांच्या संजीवन समाधी मंदिराचा जिर्णोद्धार तसेच भक्त निवासाचे उद्घाटन राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते करण्यात आले प्रारंभी मंदीर संस्थानाच्यावतीने अध्यक्ष ह भ प संजयमहाराज धोंडगे यांनी प्रास्ताविक केले. त्यानंतर मंदीर संस्थानाच्यावतीने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा विश्‍वस्त मंडळाच्यावतीने वारकरी सांप्रदायिक पद्धतीने सत्कार करण्यात आला. संत निवृतीनाथ महाराजांच्या मंदीरात येणारा मी पहिलाच मुख्यमंत्री असुन याचा मला अभिमान आहे असे सांगून मंदीर बांधकाम करताना राज्य शासनाकडुन काहीही कमी पडु देणार नसल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले. संत सांप्रदायिक आणि वारकरी परिवारासाठी अतिशय मौल्यवान क्षण असुन या संत सोहळ्याला राज्यातील वारकरी संप्रदायातील भाविकांचे संस्थानच्या वतीने आभार मानले.

ओझर विमानतळावर फडणवीस यांचे दुपारी आगमन झाले. मोटारीने त्यांचा ताफा त्र्यंबकेश्‍वरच्या दिशेने नाशिकमार्गे निघाला असता महामार्गावर कोणार्कनगर परिसरात चौफूलीवर शेतक-यांनी काळे झेंडे फडकावून निषेध व्यक्त केला. समृध्दीबाधित शेतक-यांचा एक गट येथील एका हॉटेलमध्ये चहापानासाठी जमला व त्यानंतर अचानाकपणे चौफुलीवरील जोड रस्त्यांची वाहतूक ताफ्याला मार्गस्थ होण्यासाठी पोलिसांकडून थांबविली गेली. शेतकरी सतर्क होत हॉटेलमधून एक-एक करुन बाहेर पडले आणि चौफूलीवरील समांतर रस्त्याच्या बाजूने संरक्षक जाळ्यांच्या ठिकाणी बघ्यांच्या स्वरुपात येऊन उभे राहिले. फडणवीस यांचा ताफ्यामधील पोलीस वाहनांचा सायरन ऐकू येताच शेतकरी सावध झाले आणि वाहने जवळ आल्यानंतर दहा ते बारा शेतकर्‍यांनी फडणवीस यांच्या ताफ्याला काळे झेंडे दाखविले. सदर बाब बंदोबस्तावरील पोलिसांच्या निदर्शनास येताच त्यांनी तत्काळ संबंधित शेतकर्‍यांना ताब्यात घेत आडगाव पोलीस ठाण्यात नेल्याचे समजते.

काळ्या झेंड्यांनी स्वागतनाशिक-त्र्यंबकेश्‍वर दौ-यावर आलेले मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या ताफ्याला मंगळवारी (दि.26) मुंबई-आग्रा महामार्गावरील कोणार्कनगर येथे शेतकर्यांनी काळे झेंडे दाखविले. शेतक-यांना ‘दलाल’ संबोधल्याच्या वक्तव्याच्या निषेधार्थ काळे झेंडे दाखविले.