नाशकात आदित्य ठाकरेंनी साधला विद्यार्थ्यांबरोबर संवाद
नाशिक, दि. 21, डिसेंबर - दप्तराचे ओझे कमी करण्यासासह खासगी संस्था व क्लासकडून होणारी विद्यार्थ्यांची लूट थांबवत आधुनिक शिक्षणपध्दतीकडे शालेय विद्यार्थ्यांचाही कल वाढणे गरजेचे आहे. यासाठी कवेळ गप्पा न मारता शिवसेनेच्या माध्यमातून अनेक उपक्रम सुरू करण्यात आल्याचे सांगून युवासेनेचे अध्यक्ष आदित्य ठाकरे यांनी रावसाहेब थोरात सभागृहात विद्यार्थ्यांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी युवसेनेच्या उपक्रमांची ऑनलाईन माहिती देत ‘डिजीटल शाळा’च भरविली.तत्पुर्वी त्यांच्या हस्ते पोलीस वसाहतीमधील मनपा शाळा क्रमांक 16 मध्ये साकारलेल्या ‘व्हर्चुअल क्लासरुम’च्या उद्घाटन करण्यात आले.
यावेळी त्यांनी येथील क्लासरुमसोबत जोडलेल्या महापालिकांच्या अन्य शाळांमधील विद्यार्थ्यांशी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे संवाद साधला.यानंतर शाळेच्या प्रारंगणात जमलेल्या विद्यार्थ्यांसोबत ठाकरे यांनी हस्तांदोलन करत फोटोसेशन केले. येथील कर्मवीर दादासाहेच फोटो गॅलरीचे उद्घाटन त्यांच्या हस्ते करण्यात आले.
रावसाहेब थोरात सभागृहात मविप्रच्या विविध शाळांसह अन्य खासगी शाळांचे विद्यार्थ्यांना निमंत्रित करण्यात आले होते.
यावेळी ठाकरे यांनी सभागृहात हजेरी लावून विद्यार्थ्यांसोबत संवाद साधला.यावेळी त्यांनी विद्यार्थ्यांना ई-मेल, ई-लर्निंग, टॅब, सोशल मिडिया आदिबाबत माहिती सांगितली. त्यानंतर आधुनिक शिक्षणपध्दतीला अनुसरून शिवसेनेच्या वतीने तयार करण्यात आलेल्या संकेतस्थळाद्वारे आधुनिक शिक्षणपध्दती विषयी ठाकरे यांनी विद्यार्थ्यांसोबत हितगुज केले.