Breaking News

कोल्हापूर विमानतळाला मिळाला 2बी परवाना; उड्डाण निश्‍चित

कोल्हापूर / मुंबई, दि. 17, डिसेंबर - कोल्हापूर विमानतळावरून 24 डिसेंबरला विमानाचे टेकऑफ होईल. 20 डिसेंबरला पूर्वचाचणी घेऊन 24 डिसेंबरपासून आठवड्यातील 3 दिवस कोल्हापूर-मुंबई विमानसेवा सुरू होणार आहे. त्यासाठी महत्वपूर्ण असलेला, 2बी डे ऑपरेटींग परवाना प्रलंबित होता. तो मिळावा यासाठी खा. धनंजय महाडिक आग्रही होते. 


ऑपरेटींग परवाना दिल्याची माहिती नागरी हवाई वाहतूक संचालनालयाचे बी. एस. भुल्लर यांनी खा. महाडिक यांना दिली. तसेच परवान्याची प्रत, एअरपोर्ट ऍथॉरिटी ऑफ इंडियाचे दिल्ली येथील सेंट्रल हेड क्वार्टर येथे पाठवण्यात आली आहे. त्यामुळे डे ऑपरेशन्स निर्धारित वेळेत सुरु होणार, हे निश्‍चित झाले आहे. डे ऑपरेटींग परवाना मिळवण्यासाठी कोल्हापूर विमानतळाच्या अधिकारी पूजा मुल यांच्यासह अधिका-यांनी विशेष प्रयत्न केल्याचेही खा. महाडिक यांनी नमूद केले.