Breaking News

‘महाराष्ट्र माझा’ छायाचित्र प्रदर्शनाच्या माध्यमातून वैभवशाली परंपरेचे दर्शन


नागपूर : छायाचित्राच्या माध्यमातून महाराष्ट्राच्या ऐतिहासिक व सांस्कृतिक परंपरेसह विविध लोककल्याणकारी योजनांचे प्रतिबिंब असलेले ‘महाराष्ट्र माझा’ हे राज्यस्तरीय छायाचित्र प्रदर्शन शासकीय मध्यवर्ती संग्रहालय (अजब बंगला) येथे आयोजित करण्यात आले आहे. या छायाचित्र प्रदर्शनाच्या माध्यमातून महाराष्ट्राच्या ऐतिहासिक व विकासात्मक परिवर्तनाची बोलकी छायाचित्र रसिकांना पाहण्यासाठी उपलब्ध झाली आहेत.

माहिती व जनसंपर्क महासंचालनालयातर्फे महाराष्ट्राच्या प्रगतीचे सचित्र दर्शन घडावे यासाठी राज्यस्तरावर छायाचित्रकारांसाठी स्पर्धा आयोजित करण्यात आली. या स्पर्धेमध्ये राज्यभरातून 3210 छायाचित्रे प्राप्त झाली होती. त्यापैकी प्रथम, द्वितीय व तृतीय तसेच उत्तेजनार्थ पारितोषिक मिळालेल्या व स्पर्धेतील निवडक उत्कृष्ट छायाचित्राचे प्रदर्शन अजब बंगल्याच्या कला दालनात आयोजित करण्यात आले आहे. छायाचित्र प्रदर्शन येत्या 15 डिसेंबरपर्यंत सकाळी 11 ते सायंकाळी 5 या वेळेत सर्वांसाठी नि:शुल्क खुले राहणार आहे.