नगर-पुणे महामार्गावरील भूषणनगरसमोर झेब्रा क्रॉसिंग व गतिरोधकाचे सुरू
अहमदनगर/प्रतिनिधी। 23 नगर-पुणे महामार्गावरील भूषणनगरसमोरील रस्त्यासमोरील अपघातग्रस्त ठिकाणावर आजपर्यंत अनेक अपघात झाले असून, या ठिकाणी झेब्रा क्रॉसिंग मारून तेथे गतिरोधक टाकणे गरजेचे होते. याकडे ठेकेदाराचे लक्ष वेधण्यात आले. हे काम पूर्ण न केल्यास सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याचा इशारा केडगाव शिवसेनेच्या वतीने देण्यात आला होता. त्यानंतर ठेकेदाराने याची दखल घेत झेब्रा क्रॉसिंग करून गतिरोधक टाकले, तसेच महामार्गावर रिफ्लेक्टर लावून साईडपट्ट्या मारण्याचे काम सुरू करण्यात आले आहे. रस्त्याची डागडुजीही करण्यात आली असून, डिव्हायडर दुरुस्ती कामही हाती घेण्यात आले असल्याचे शिवसेना शहरप्रमुख दिलीप सातपुते यांनी सांगितले.
नगर-पुणे महामार्गावरील भूषणनगरसमोरील रस्त्यासमोरील अपघातग्रस्त ठिकाणावर झेब्रा क्रॉसिंग करून गतिरोधक टाकण्यात आले असून, या कामाची शिवसेना शहरप्रमुख दिलीप सातपुते यांनी पाहणी केली. यावेळी ते बोलत होते. याप्रसंगी उपशहरप्रमुख रमेश परतानी, अजय आजबे, विठ्ठल कोतकर, अमोल येवले, वसंत ठुबे, भारत कांडेकर, किरण ठुबे, बंटी सातपुते, कैलास करांडे, संजय कोतकर आदी उपस्थित होते.
संजय कोतकर म्हणाले की, भूषणनगर समोरील महामार्गावर अनेकवेळा अपघात झाले होते. येथे झेब्रा क्रॉसिंग करावे, तसेच गतिरोधक बसवावे, अशी नागरिकांची मागणी होती. ही मागणी या रस्त्याच्या ठेकेदाराने पूर्ण केली आहे. त्यामुळे आता अपघातास पायबंद बसून नागरिकांच्या दृष्टीने सोयीचे होईल, असे ते म्हणाले.