Breaking News

हजारो फेरीवालयांचा मनपावर धडक निर्धार मोर्चा

नवी मुंबई, दि. 12, डिसेंबर - राष्ट्रीय फेरीवाला धोरणा नुसार पथविक्रेता अधिनियम 2014 हया कायदाची अंमलबजावणी करण्यासाठी नवी मुबईतील विविध फेरीवाला संघटनांनी नवीमुबई हॉकसॅ फेडरेशन च्या नेतृत्वा खाली मनपा प्रशासना विरोधात आज मोर्चा काढून धरणे आंदोलन केले. 


पालिका मुख्यालया समोरील असणार्या रस्त्यावर सकाळी 11 वाजल्यापासून फेरीवाले मोर्च्यात सहभागी हात होते. या मोर्च्यात शेकडो फेरीवाले सहभागी झाले होत.. दुपारी 3 वाजे पर्यत प्रशासाने फेरीवाला मोर्च्याला भेट न दिल्याने शिष्टमंडळ आयुक्तांना भेटण्यासाठी गेले असता तेथेही त्यांनी भेट नाकारली. त्यामुळे संतप्त फेरीवाल्यांनी पालिका मुख्यालयातच ठिय्या मांडत प्रशासनाचा निषेध केला. सायंकाळी 5 नंतर मोर्चा स्थगित करून मागण्या मान्य न केल्यास पुढील आठवड्यापासून साखळी उपोषण करण्याचा निर्णय घेण्यात आला.

मनपा प्रशासनाने लवकरात लवकर राष्ट्रीय फेरीवाला धोरणा नुसार पथविकैता अधिनियम कायदा 2014 ची अंमलबजावणी करावी. मनपा प्रशासनाने नवीमुंबई तील सर्व फेरीवालाचे सवॅक्षण होईपर्यंत फेरीवाला वरील कारवाई थाबवाई. फेरीवाला परवाना देताना स्थानिक प्रकल्पगृस्ताना प्रथम प्राधान्य देण्यात आलेच पाहिजे. 15 वषॉ च्या रहिवाशी दाखल्याची अट 2009 पथविकैता अधिनियम कायदा नुसार कमी करण्यात यावी. शहर फेरीवाला समिती नव्याने गठीत करण्यात यावी. त्याच प्रमाणे विविध वाडॅ मध्ये प्रभाग फेरीवाला स मिती तात्काळ स्थापन करण्यात यावी. शहर फेरीवाला समिती ला विचारात घेतल्या शिवाय नवीमुबई तील फेरीवाला बाबत धोरणात्मक निर्णय परस्पर मनपा प्रशासनाने घेवू नयेत. विविध मागण्या नवीमुबई फेरीवाला फेडरेशन च्या माध्यमातून नवीमुबई मनपा प्रशासनाकडे करण्यात आल्या.