Breaking News

आ. थोरातांच्या नेतृत्वाखाली शेकडो काँग्रेस कार्यकर्ते नागपूरातील मोर्चास सहभागी

संगमनेर/प्रतिनिधी। शेतकरी कर्जमाफी, बोंडअळीमुळे कपाशीचे झालेले नुकसान आणि विषारी कीटकनाशकांमुळे यवतमाळ जिल्ह्यात गेलेल्या बळींच्या पार्श्‍वभूमीवर राज्य सरकारला जाब विचारण्यासाठी नागपूर हिवाळी अधिवेशनावर मोर्चात काँग्रेस नेते आ. बाळासाहेब थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली शेकडो काँग्रेस कार्यकर्ते नागपूरात सहभागी झाले आहे. यशोधन कार्यालय येथून हे कार्यकर्ते आ.बाळासाहेब थोरात व आ.डॉ.सुधीर तांबे यांच्या नेतृत्वाखाली शेकडो काँग्रेस कार्यकर्ते नागपूरला रवाना झाले आहे. 


यावेळी कांचनताई थोरात, नगराध्यक्षा दुर्गाताई तांबे व इंद्रजीत थोरात, बाळा ओहळ यांनी त्यांना शुभेच्छा दिल्या. यावेळी केशवराव मुर्तडक, तात्यासाहेब कुटे, रामनाथ शिंदे, राजेंद्र थोरात, निलेश थोरात, कचरु गडाख आदी उपस्थित होते.

यावेळी इंद्रजीत थोरात म्हणाले की, सध्याचे सरकार हे गोरगरिब शेतकरी विरोधी आहे. या सरकारच्या शेतकरी विरोधी धोेरणांचा निषेध करण्यासाठी व शेतकर्‍यांच्या विविध मांगण्यांसाठी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसच्या वतीने विधान भवनावर धडक मोेर्चाचे आयोजन करण्यात आले आहे. संगमनेर तालुका आ.बाळासाहेब थोरात यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेसच्या विचारांचा आहे.या मोर्चात सहभागी होण्यासाठी शेकडो कार्यकर्ते नागपूरला गेले असल्याचे ही ते म्हणाले. 

यावेळी केशवराव मुर्तडक म्हणाले कि, आ.थोरात व आ.डॉ.तांबे यांच्या नेतृत्वाखाली विधानभवनावर हा मोर्चा होत असून शेतकर्‍यांच्या विविध प्रश्‍नांबाबद सरकारला जाब विचारला जाईल. या आंदोलनासाठी बंटी यादव, दिपक बोरकर, चंद्रकांत पांडे, रामनाथ लांडगे, किसन रणमाळे आदिंसह तालुका काँग्रेस, शहर काँग्रेस, युवक काँग्रेस व महिला काँग्रेसचे अनेक कार्यकर्ते मोठया संख्येने सहभागी झाले आहे.