Breaking News

सरपंचपदासाठी ७१ अर्ज दाखल ; दि.२७ ला मतदान


राहाता प्रतिनिधी  - राहाता तालुक्यातील ८ ग्रामपंचायतींसाठी काल {दि.११} नामनिर्देशनपत्र दाखल करण्याच्या शेवटच्या दिवशी सरपंचपदाच्या ८ जागांसाठी ७१ उमेदवारांनी अर्ज दाखल केले. तर सदस्यपदाच्या ९८ जागांपैकी दुर्गापूर ग्रामपंचायतीच्या ५ जागा बिनविरोध झाल्याने उर्वरित ९३ जागांसाठी ३०९ उमेदवारी अर्ज दाखल झाले आहेत. येत्या दि.२७ रोजी मतदान होणार आहे, अशी माहिती निवडणूक निर्णय अधिकारी तहसीलदार माणिकराव आहेर व नायब तहसीलदार राहुल कोताडे यांनी दिली.
राहाता तालुक्यातील निमगाव कोर्हाळे ग्रामपंचायतीच्या सदस्यपदाच्या १३ जागांसाठी ५० उमेदवारांनी अर्ज दाखल केले. तर सरपंचपदासाठी ८ उमेदवारी अर्ज दाखल झाले आहेत. दहेगाव कोर्हाळे ग्रामपंचायतीच्या सदस्यपदांच्या ९ जागांसाठी २९ तर सरपंचपदासाठी १० उमेदवारी अर्ज दाखल झाले आहेत. कोर्हाळे ग्रामपंचायतीच्या १३ जागांसाठी ५३ तर सरपंचपदासाठी १३ अर्ज दाखल झाले आहेत. पिंपरी निर्मळ ग्रामपंचायतीच्या सदस्यपदाच्या १३ जागांसाठी ४६ तर सरपंचपदासाठी १० उमेदवारी अर्ज दाखल झाले आहेत. 

वाकडी ग्रामपंचायतीच्या १७ जागांसाठी ५२ उमेदवारी अर्ज तर सरपंचपदासाठी ८ अर्ज आले आहेत. धनगरवाडी ग्रामपंचायतीच्या सरपंचपदासाठी ४ तर सदस्यपदाच्या ७ जागांसाठी २० अर्ज दाखल झाले. दुर्गापूर ग्रामपंचायतीच्या सरपंचपदासाठी २ उमेदवारी अर्ज तर सदस्यपदाच्या ९ पैकी ५ जागा बिनविरोध झाले. त्यामुळे उर्वरीत ४ जागांसाठी १६ उमेदवारी अर्ज दाखल झाले. दाढ बुद्रुक ग्रामपंचायतीच्या सदस्यपदाच्या १७ जागांसाठी ४३ अर्ज दाखल तर सरपंचपदासाठी १६ उमेदवारी अर्ज दाखल झाले आहेत. सरपंच व सदस्यपदांसाठीही विक्रमी अर्ज दाखल झाल्याने बहुतांश ठिकाणी तिरंगी लढती होण्याची शक्यता आहे.