Breaking News

देशभरात एका वर्षात रस्ते अपघातांत ४.८० लाख जणांचा मृत्यू

नवी दिल्ली : गतवर्षी रस्ते अपघातांत ४ लाख ८० हजार ६५२ जणांचा मृत्यू झाल्याचे सरकारने गुरुवारी लोकसभेत सांगितले. यापैकी १४ हजार ८९४ जणांचा मृत्यू मद्यपान करून वाहन चालविल्यामुळे झाल्याचेही सरकारने म्हटले आहे. 


लोकसभेत जगदंबिका पाल, एम. आय. शानवास, वरुण गांधी यांनी विचारलेल्या प्रश्नाच्या उत्तरात रस्ते, परिवहन व महामार्ग राज्यमंत्री मनसुख एल. मांडवी यांनी वरील माहिती दिली. २०१५ मध्ये रस्ते अपघातांत मृत्युमुखी पडणाऱ्यांची संख्या ५ लाख १ हजार ४२३ इतकी होती. यापैकी १६ हजार २९८ जणांचा मृत्यू मद्यपान करून वाहन चालविल्यामुळे झाल्याचेही त्यानी सांगितले. मद्यपान करून वाहन चालविल्याने सर्वाधिक ४६३३ मृत्यू उत्तर प्रदेशात झाल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले..