नवी दिल्ली : हिमाचल प्रदेश व गुजरातमध्ये विजयाची गुढी उभारल्यानंतर आता अरुणाचल प्रदेश व उत्तर प्रदेशात झालेल्या पोटनिवडणुकीत भाजपचे कमळ फुलले आहे. आपल्या पराभवाच्या घटनाक्रमात काँग्रेसचे या दोन्ही राज्यांत पुन्हा पानिपत झाले आहे. दुसरीकडे, पश्चिम बंगालच्या पोटनिवडणुकीत सत्तारूढ तृणमूल काँग्रेसचा दबदबा पुन्हा सिद्ध झाला आहे. . उत्तर प्रदेशच्या सिकंदरा मतदारसंघात आपले वर्चस्व कायम राखत भाजपचे अजित पाल विजयी झाले आहेत. त्यांनी सपच्या उमेदवार सीमा सचान यांना ११ हजार मतांनी पराभूत केले. काँग्रेसचे उमेदवार प्रभाकर पांडे हे या ठिकाणी तिसऱ्या स्थानी राहिले.
पोटनिवडणुकीत कमळ फुलले; काँग्रेसचे पानिपत
Reviewed by Dainik Lokmanthan
on
14:15
Rating: 5