गुळाचा भाव वधारला, हळद ’जैसे थे’च
सांगली, दि. 25, डिसेंंबर - सांगली कृषी उत्पन्न बाजार समितीत गुळाला प्रतिक्विंटलला 3200 ते 4500 रूपये इतका दर मिळाला आहे. मात्र हळदीची आवक घटली असतानाही दरात काहीच बदल झालेला नाही.
बाजार समितीत 15 ते 23 डिसेंबर या कालावधीत गुळाला प्रतिक्विंटल 4500 रूपये इतका चांगला दर मिळाला.
कोल्हापुरी गूळ रव्याची एक हजार 186 क्विंटल आवक झाली आहे. कोल्हापूर भेलीची एक हजार 531 क्विंटल आवक झाली आहे. या कोल्हापूर भेली गुळाला क्विंटलला 3200 ते 4500 रूपये दर मिळाला.
सध्या राजापुरी हळदीची आवक मंदावली आहे. आतापर्यंत 48 लाख 946 क्विंटल हळदीची आवक झाली असून क्विंटलला 5100 ते 9600 रूपये दर मिळाला आहे. सोयाबीनचे दर खूपच खाली आले होते. पण सध्या आवक घटल्यामुळे प्रतिक्विंटल 3200 रूपये दर झाला आहे. बेदाण्याची आतापर्यंत दोन लाख 32 हजार 555 क्विंटल आवक झाली आहे. या बेदाण्यास क्विंटलला दहा हजार ते 18 हजार 500 रूपये दर मिळाला आहे.