मानवतावादाच्या नावाखाली रोहिंग्याना पायघड्या
सिंधुदुर्गनगरी, दि. 25, डिसेंंबर - मानवतावादाच्या नावाखाली आपल्या देशात रोहिंग्याना पायघड्या पसरवल्या जात आहेत, अशी टीका संभाजी भिडे गुरुजी यांनी केली. शिवरायांनी जी अमोल कामगीरी केली त्याबद्दल सुद्धा त्यानी मार्गदर्शन केले. कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी या सभेला कडेकोट पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला होता.
प्राचीन काळापासून आपल्या देशावर आक्रमण होत आली. आताही ती बांगलादेशी तसेच रोहिंग्याच्या रूपाने सुरूच आहेत, मात्र आताही या आक्रमणांना मानवतावादाच्या आड देशात पायघड्या पसरवल्या जात आहेत, अशी टीका संभाजी भिडे गुरुजी यांनी शनिवारी सावंतवाडी इथे आयोजित सभेत केली. रायगड किल्ल्यावरील 32 मण सुवर्ण सिंहासन संकल्प पुर्तीसाठी स्वराज्य संघटनेच्या वतीने संभाजी भिडे गुरुजी यांचे व्याख्यान शनिवारी रात्री सावंतवाड़ीच्या गांधी चौकात आयोजित करण्यात आले होते, यावेळी ते बोलत होते. आता देश वाचवायचा असेल, तर पुन्हा एकदा मराठ्यांचा इतिहास वाचायची गरज आहे, असे आवाहनही त्यांनी केले.