Breaking News

परभणीमध्ये अवैध वाळू वाहतुकीवर जिल्हाधिका-यांची कारवाई

 परभणी, दि. 17, डिसेंबर - परभणीमधील पूर्णा तालुक्यातील अवैध वाळू वाहतुकीवर जिल्हाधिकारी पी. शिवषणकर यांनी आज पहाटे 4 च्या सुमारास कारवाईला सुरू वात केली. जिल्हाधिका-यांनी खरबडा, वझुर तर परभणी तालुक्यातील धामणी येथे कारवाईला सुरूवात केली. 


जिल्हाधिका-यांनी आज केलेल्या कारवाईत खरबडा शिवारात चोरटी वाहतूक करणारे टिपर आढळून आले. तर, वझुर शिवारात रेती साठा व एक टिपर आढळले. सर्व वाहने ताडक ळस पोलीस ठाण्यात नेण्यात आली आहेत. यावर प्रत्येकी 20 हजार आठशे रुपयाचा दंड ठोठावण्यात येणार आहे, अशी माहिती तहसीलदार श्याम मंदनूरकर यांनी दिली. जिल्हाधिकार्‍यांच्या या धडाकेबाज मोहिमेने वाळू माफियांच्या धाबे दणाणले आहेत.