Breaking News

पुण्यात हायप्रोफार्इल सेक्स रॅकेटचा भंडाफोड

पुणे : पुण्यातील उच्चभ्रु समजल्या जाणाऱ्या कोरेगाव पार्क परिसरातील एका पंचतारांकित हॉटेलमध्ये देशातील व परदेशातील मुलींना पैशाचे अमिष दाखवून अवैध वेश्याव्यवसाय करवून घेत जात असल्याची माहिती सामाजिक सुरक्षा विभागाचे पोलीस नार्इक नितीन तेलंगे यांना मिळाली होती. 


त्यानुसार पोलिसांनी हॉटेलवर छापा टाकून हायप्रोफार्इल सेक्स रॅकेट उघडकीस आणत, एक नेपाळची व एका भारतीय तरुणीची वेश्याव्यवसायातून सुटका केली अाहे.याप्रकरणी आरोपी सुमन ऊर्फ राज, कुमार व रोहित या वेश्याव्यवसाय दलालां विरोधात कोरेगावपार्क पोलिस ठाण्यात अनैतिक मानवी व्यापार प्रतिबंध अधिनियम कलमांनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सदर गुन्हयातील पीडित मुलींना रेसक्यु होम, महमंदवाडी हडपसर याठिकाणी संरक्षणकामी ठेवण्यात आले आहे.