अभाविप ही देशाला दिशा देणारी चळवळ - आशीष शेलार
रत्नागिरी, दि. 29, डिसेंबर - भारत येत्या 2022 साली अमृत महोत्सव साजरा करणार आहे. याकरिता अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या कार्यकर्त्यांनी आपापल्या क्षेत्रात नियोजन करावे. सामाजिक क्षेत्र, व्यवसाय, उद्योगामध्ये वेगळेपणाने काय करू शकतो, याचा विचार करावा. अभाविप ही देशाला दिशा देणारी चळवळ आहे. त्यातील कार्यकर्त्याने ‘भारत 75’ साठी सज्ज व्हावे, असे आवाहन भाजपचे आमदार आणि मुंबई भाजपचे अध्यक्ष आशीष शेलार यांनी केले.
येथे सुरू असलेल्या अभाविपच्या बावन्नाव्या कोकण प्रदेश अधिवेशनात माजी कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात ते बोलत होते. आज सकाळी त्यांनी अधिवेशनासाठी धावता दौरा केला. शेलार यांनी सांगितले की, अभाविपने ऐनवेळी उद्भवलेल्या प्रसंगाला कसे सामोरे जावे हे शिकवले. त्याचा उपयोग आजही होतो. काही वेळा राजकारणातही त्याचा उपयोग करता येतो. वानखेडे स्टेडियमवर 20-20 चा आंतरराष्ट्रीय सामना चालू असताना दिव्यांचा उजेड कमी असल्याची तक्रार आली. या तक्रारीवर पंधरा मिनिटांत कसे उत्तर शोधले, त्याचा किस्सा शेलार यांनी सांगितला व अभाविपमध्ये केलेल्या कामाचा उपयोग केल्याचे सांगितले.