Breaking News

सास-याने केला सुनेवर बलात्कार; आरोपीला अटक.


ठाणे, दि. 25, डिसेंंबर - पती आणि मुलांना ठार मारण्याची धमकी देत सासर्‍यानेच स्वत:च्या सुनेवर वारंवार बलात्कार केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या प्रकरणी पी डित महिलेने श्रीनगर पोलीस ठाण्यात तक्रार केली. महिलेने दिलेल्या तक्रारीच्या आधारावर पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून आरोपीला अटक करण्यात आली आहे.
पीडित महिलेचा सासरा हा सुनेला कामानिमित्त जवळ बोलावून तिची वारंवार छेड करायचा. या नराधम सासर्‍याने 2013 मध्ये पहिल्यांदा त्यांच्या राहत्या घरी सुनेला बोलावून घेतले. तिला तिच्या पती आणि मुलांना ठार मारण्याची धमकी दिली. यानंतर घोडबंदर रोडवरील लॉजमध्ये नेवून तिच्यावर बलात्कार केला. अखेर पीडित महिलेने सासर्‍याच्या जाचाला कंटाळून श्रीनगर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली.