Breaking News

नितीन आगेला न्याय मिळावा या मागणीसाठी राहुरीत रास्तारोको आंदोलन.


राहुरी प्रतिनिधी :- खर्डा हत्याकांडातील दलित विद्यार्थी नितिन आगे खून खटल्याची फेर सुनावणी होवून फितुर साक्षीदारांवर गुन्हे दाखल करावेत व साक्षीदार शासकीय सेवेत कर्मचारी आहेत त्यांना नोकरीतुन बडतर्फ करावे फितुर साक्षीदारांची सी. बी. आय. चौकशी होवून नार्को चाचणी करुन त्यांना खटल्यात सहआरोपी करावे कोपर्डी प्रकरणातील आरोपीचे सरकारी वकील यांना दिलेल्या धमकीचा अॅट्रासिटी गुन्हा दाखल करावा व अहमदनगर जिल्हा हा दलित अत्याचार ग्रस्त घोषित करावा अॅट्रासिटी कायदा कडक करावा आदि विविध मागण्यांसह आर पी आय च्या वतिने राहुरी नगर मनमाड रोड येथिल बस स्थानकासमोर आज दुपारी 12 वाजे दरम्यान रस्तारोको करण्यात आला होता यावेळी आर पी तालुका अध्यक्ष सुरेद्र थोरात यांच्या नेत्रृत्वाखाली भव्य रस्तारोखो करण्यात आला.

रिपाइं तालुकाध्यक्ष सुरेंद्र थोरात, एकलव्य संघटनेचे संस्थापक अध्यक्ष शिवाजी ढवळे, शहर अध्यक्ष विलास साळवे जिल्हा कार्याध्यक्ष सुभाष त्रिभुवन, राज्य सचिव अशोक गायकवाड, संजय कांबळे, किरण दाभाडे, सुनिल जाधव ,किशोर ठोकळ, श्रीरामपुर ता.अध्यक्ष सुनील सिरसाट, अनिल जाधव यांनी मनोगत व्यक्त केले

जामखेड तालुक्यातील खर्डा येथील नितीन आगे या शालेय विद्यार्थ्याची भरदिवसा निर्घुण खून करण्यात आला या खुनाचा खटला जिल्हा सत्र न्यायालय अहमदनगर येथे चालू असतांना पोलीस तपासात २६ जणांना साक्षीदार बनविण्यात आले. नितीन आगे यांना मारहाण करतांना प्रत्यक्षदर्शी व सरकारी साक्षीदार फितूर झाले. आगे खून खटला प्रकरणातील सर्वच्या सर्व ९ आरोपी निर्दोष सुटले त्यामुळे समाजात असंतोषतेचे वातावरण निर्माण झाले आहे. 


                                  
या पार्श्वभूमीवर पोलीस यंत्रणा, सरकारी वकील व प्रत्यदर्शी साक्षीदार यांनी संगनमतीने फंदफितुरी करून या आरोपींना निर्दोष सोडण्यापाठीमागे याच यंत्रणेचा सहभाग असल्याचे निवेदनात आरोप करण्यात आला आहे. या प्रकरणामुळे देशातील न्यायप्रणाली ढिसाळ होत चालली असून, या न्यायप्रणालीची समाजातील काही घटकांकडून पायमल्ली होत असल्याचे दिसत आहे. 

डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी देशाला घालून दिलेल्या न्यायव्यवस्थेला धनदांडग्याच्या दंडेलशाही व हुकुमशाहीमुळे अस्थिरता निर्माण झाली आहे. म्हणून सबळ पुरावे असूनही मयत नितीन आगे यांना योग्य न्याय मिळालेला नाही. म्हणून नितीन आगे व त्यांच्या कुटुंबियांना न्याय मिळवून देण्यासाठी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले गट ) रस्त्यावर उतरले होते. 

या निवेदनाद्वारे मागणी करण्यात आली कि, नितीन आगे खून खटल्यातील फितूर झालेले सरकारी साक्षीदार यांचेवर गुन्हे दाखल करावेत, आगे खून खटला प्रकरणाची फेर सुनावणी व्हावी, सरकारी साक्षीदार यांचेवर असलेल्या नोकरदारांना नोकरीतून तात्काळ बडतर्फ करण्यात यावे तसेच या प्रकरणाचे न्यायालयीन कामकाज पाहणेसाठी विशेष सरकारी वकील उमेशचंद्र यादव यांची नियुक्ती व्हावी अदि मागण्या या निवेद्नाद्वारे करण्यात येत आहे. 


निवेदन तहसिलदार अनिल दौडे व नि. प्रमोद वाघ यांनी स्विकारले मोर्चासाठी पो. नि. प्रमोद वाघ,सहा.पो.नि.दिलीप राठोड,पी. एस.आय. लक्ष्मण भोसले, सतिश सिरसाठ गोपनिय शाखेचे ढाकणे यासह पोलिस बंदो बस्तासह राज्य राखीव दलाची तुकडी तैनात होती तब्बल दिड तास रास्तारोको केल्याने दुतर्फा वाहनांच्या रांगा लागल्या होत्या.या अंदोलनात नितिन आगेचे कुटूंब हजर होते.