Breaking News

लोहगाव विमानतळावर 97 लाख रुपयांचे सोने जप्त

पुणे  दि. 21, डिसेंबर - येथील लोहगाव विमानतळावर एका प्रवाशाकडून 4.371 किलोचे 18 कॅरेटचे सुमारे 97 लाख रुपयांचे सोने आज जप्त करण्यात आले. सीमा शुल्क विभागाच्या अधिका-यांनी ही कारवाई केली आहे. सैफुला नासर दुदगावे (रा. कोल्हापूर) याच्याकडून हे सोने जप्त करण्यात आले.


आज दुपारी 4.30 वाजण्याच्या सुमारास अबुधाबीवरून आलेले जेट एअरवेजचे विमान लोहगाव विमानतळावर उतरले. तेव्हा सामान तपासादरम्यान सैफुलाची हालचाल संशयास्पद असल्याने अधिका-यांनी त्याला थांबवले. अधिक तपासात त्याच्याकडून धातूच्या वस्तू सापडल्या. त्यात शिलाई मशिन व इस्त्रीत सोने लपवून आणले जात होते. या सोन्याची किं मत 97 लाख रुपये आहे. या प्रकरणी अधिक तपास सीमा शुल्क विभागाचे उपायुक्त भारत नवले करत आहेत.