Breaking News

राहुल काँग्रेसला एका नव्या उंचीवर नेईल - सोनिया गांधी.


पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या कठोर टीकेमुळेच माझा मुलगा राहुल आता कणखर बनलाय. काँग्रेस पक्षाध्यक्षपदाची धुरा स्वीकारल्याबद्दल आई म्हणून मी त्याचे अभिनंदन करते, अशा शब्दात सोनिया गांधींनी राहुल गांधींना शुभेच्छा दिल्या. 

काँग्रेसचे नवनिर्वाचित अध्यक्ष राहूल गांधी यांनी शनिवारी अध्यक्षपदांची सूत्रे स्वीकारल्यानंतर त्या माध्यमांशी बोलत होत्या '' राहुल गांधी माझा मुलगा आहे, त्यामुळे त्याची स्तुती करणं मला योग्य वाटत नाही. राहुलने लहानपणापासून हिंसा पाहिलीये. जेव्हा राहुल राजकारणात आला तेव्हा त्याला अनेक अडचणींना सामना करावा लागला. पण, राहुल हा खंबीर आणि मृदुभाषी व्यक्ती आहे तो नक्की काँग्रेसला एका नव्या उंचीवर नेईल असा विश्‍वासही त्यांनी व्यक्त केला.