Breaking News

लासलगावी कांद्याची विक्रमी आवक

लासलगांव, दि. 17, डिसेंबर - येथील कृषि उत्पन्न बाजार समितीच्या मुख्य बाजार आवारात आज 2,217 वाहनांमधुन सर्वाधिक 34,866 क्विंटल लाल कांद्याची आवक झाली. बाजारभाव कमीत कमी रू. 900/-, जास्तीत जास्त रू. 3,420/- व सर्वसाधारण रू. 2,851/- प्रती क्विंटल होते.


आज आठवड्याच्या शेवटच्या दिवशी येथील बाजार समितीचे श्री छत्रपती शिवाजी महाराज स्वतंत्र कांदा बाजार आवार सकाळपासुन वाहनांच्या गर्दीमुळे फुलून गेले होते. आज दिवसभरात येथील बाजार आवारावर 1,377 ट्रॅक्टर व 840 पिकअप मधुन 34,866 क्विंटल कांदा विक्रीस आला होता. शनिवार, साप्ताहीक सुट्टी व सोमवारी अमावस्येमुळे कांदा लिलाव बंद राहणार असल्याने येथील बाजार समितीत कांदा विक्री करणेसाठी शेतकरी बांधवांनी एकच गर्दी केली होती. बाजार आवारावर आलेल्या सर्व आवकेचे लिलाव पुर्ण क रण्याच्या दृष्टीने सर्व अडते, व्यापारी, मदतनीस, कामगार व बाजार समितीच्या सेवकांनी जलदगतीने लिलाव प्रक्रिया पुर्ण केल्याने आज विक्रमी कांदा आवकेचा लिलाव पुर्ण क रण्यात त्यांना यश आले.