Breaking News

अल्पवयीन दिव्यांग बालिकेवर बलात्कार

लातूर, दि. 14, डिसेंबर - उद्गीर तालुक्यातील तोंडचिर येथे एका अल्पवयीन दिव्यांग मुलीला खाऊचे आमिष दाखवीत एका 60 वर्षीय इसमाने बलात्कार केल्याची घटना घडली आहे. या प्रकरणी पोलिसांनी आरोपी तुकाराम जाधव यास अटक केली आहे.


तुकाराम जाधवचे पीडित मुलीच्या घराशेजारी किराणा मालाचे दुकान असून पीडित मुलगी घराजवळ खेळत असताना आरोपी जाधवने तिला खाऊचे आमिष दाखवून घरात बोलावून घेत तिच्यावर अत्याचार केला. या घटनेची माहिती पीडितेच्या पालकांना समजताच, त्यांनी तात्काळ उदगीर ग्रामीण पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. त्यानंतर पोलिसांनी आरोपी तुकाराम जाधव विरोधात गुन्हा दाखल करून अटक केली आहे.