अंबरनाथचा कचरा ठेक्यासह कुर्लाच्या खासगी विकासकाने शासनाची फसवणूक केल्याप्रकरणी ना. मुंडेंची लक्षवेधी
नागपुर/प्रतिनिधी : अंबरनाथचा कचरा उचलण्याच्या टेंडरमध्ये झालेला आर्थिक व्यवहार आणि कुर्ला येथील विकासकाने केलेली शासनाची फसवणूक या मुद्यावर विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी लक्षवेधी आणली आहे. या संदर्भात मिळालेली माहीती अशी की, अंबरनाथ नगरपरिषदेअंतर्गत शहरातील कचरा उचलून तो वाहून नेण्यासाठी कंत्राटदाराला ठेका देतांना मोठा आर्थिक व्यवहार झाल्याची तक्रार ना.धनंजय मुंडे यांना प्राप्त झाली होती. त्या तक्रारीच्या अनुषंगाने धनंजय मुंडे हा मुद्दा सभागृहात लक्षवेधीच्या माध्यमातून उपस्थित केला आहे.
अंबरनाथ नगरपरिषदेचे अधिकारी आणि काही नगरसेवक यांनी संगनमताने चौदाव्या वित्त आयोगाच्या निधीचा दुरूपयोग हा ठेका देतांना केला. हा ठेका मिळवण्यासाठी मे. समिक्षा कन्सट्रक्शन या कंपनीने चुकीची माहिती सादर करून निविदा प्राप्त करून नगरपरिषदेची फसवणूक करणे, निविदा मंजूर प्रक्रियेचे पालन न करणे, गैरमार्गाने ठराव पारित करून नगरसेवक अधिकार्यांनी कंत्राटदारास आर्थिक फायदा मिळवून देण्याच्या हेतूने निर्णय घेणे, महाराष्ट्र प्रदुषण नियंत्रण मंडळाचे अधिकृत प्रमाणपत्र नसतांना कंपनीचा परवाना संपलेला असताना, एमआयडीसीचे नाहरकत प्रमाणपत्र नसतांना ठेका देणे, आक्षेप बोगस वजन मापावर देयके अदा करणे यासारखे आक्षेप नोंदवून या आर्थिक व्यवहाराची चौकशी व्हावी अशी या लक्षवेधीची मागणी आहे.
दरम्यान मुंबईतील खासगी विकासक श्रीमती भाविनी हरीष सावला यांच्या फोरसाईट बिल्डर कंपनीने बृहन्मुंबई महापालिकेने रहिवासी कारणासाठी इमारत नकाशे मंजूर केले असतानाही अटी शर्तींचा भंग करून सुट दिलेल्या क्षेत्राचा वापर वाणिज्य कारणासाठी केल्याच्या तक्रारीवरून ना. धनंजय मुंडे यांनी सभागृहाचे या फसवणूकीकडे लक्ष वेधले आहे. शासनाची फसवणूक करणार्या विकासकाविरूध्द फौजदारी गुन्हा दाखल करावा अशी या लक्षवेधीची मागणी आहे.