Breaking News

गडचिरोलीत दोन जहाल नक्षल्यांचे आत्मसमर्पण

गडचिरोली : नक्षल्यांच्या पीपल्स लिबरेशन गुरीला आर्मी (पीएलजीए) सप्ताहाच्या पार्श्वभूमीवर नक्षल चळवळीतील दोन जहाल नक्षल्यांनी गुरुवारी (७ डिसेंबर) गडचिरोली पोलिसांसमोर आत्मसमर्पण केले. कमला रामसू गावळे व नागेश उर्फ राजेश मत्तुरसाय मडावी अशी आत्मसमर्पण केलेल्या नक्षल्यांची नावे आहेत. या दोघांच्या आत्मसमर्पणामुळे गडचिरोली पोलिसांना मोठे यश मिळाले आहे.


कमला रामसू गावळे ही महिला कोरची दलममध्ये कार्यरत होती. २०११ मध्ये केकडी दलममध्ये सदस्य म्हणून भरती झाली होती. ती फुलगोंदी चकमक, टाहकटोला येथील हत्या आदी गंभीर गुन्ह्यात तिचा सहभाग होता. शासनाने तिच्यावर दोन लाख रुपयांचे बक्षीस जाहीर केले होते. तर, नागेश ऊर्फ राजेश मत्तुरसाय मडावी हा २०११ मध्ये दलम पल्लेमाडी (छत्तीसगड)मध्ये सदस्य पदावर भरती झाला होता.