साडे पाच लाखाची बनावट दारू जप्त
याबाबत राज्य उत्पादन शुल्क भरारी पथक क्रमांक २ ने दिलेली माहिती अशी की राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या आयुक्त डॉ.अश्विनी जोशी,प्रभारी जिल्हाधिकारी विश्वजीत माने यांच्या आदेशानुसार ग्रामपंचायत निवडणूक,नाताळ व ३१ डिसेंबरच्या पार्श्वभूमीवर परराज्यातील मद्य बनावट वाहतूक विक्री होण्याची शक्यता गृहीत धरून विभागीय उपायुक्त अर्जुन ओव्हाळ,नगर जिल्हाअधीक्षक पराग नवलकर,यांच्या मार्गदर्शनाखाली नेवासा भागात खबऱ्यामार्फत गुप्त माहिती काढली.
दोन दिवसांपासून पाचेगाव शिवारात परराज्यातील दारू येणार असल्याची खबर लागल्याने सदर पथकाने पाळत ठेऊन सय्यद वस्तीवर बुधवारी सायंकाळच्या सुमारास छापा टाकला.छाप्यात १९२ बॉक्स, ७५० मिलीचे एकूण २३०४ बाटल्या, मुद्देमाल ज्याची बाजारात किंमत चार लाख सत्तर हजार सोळा रुपये आहे. या गुन्ह्यातील आरोपी अकील रफिक वहाब सय्यद व मनोज रायपल्ली फरार आहेत.या प्रकरणाचा पुढील तपास राज्य उत्पादन शुल्कचे दुय्यम निरीक्षक एस.आर. कुसळे करीत आहे.
अवैध मद्य वाहतुकीस पाळत ठेऊन गस्त घालत असतांना संशयीत शेवाळी रंगाची मारुती ८०० हे वाहन नेवासाफाटा येथून नेवाशाच्या दिशेने भरधाव वेगाने जात असतांना तिचा पाठलाग केला असता वाहन चालकाने आपले वाहन विवेकानंदनगर मधील लाकडी सॉ मिल जवळ वाहन लावून पसार झाला.
