पाथर्डी नगरपरिषदेच्या स्वच्छ भारत सर्वेक्षण उपक्रमास सुरुवात.
यावेळी शहरातील सावित्रीबाई फुले विद्या मंदिर शाळेतील विद्यार्थ्यांना क्रीडा गणवेशाचे वाटप करण्यात आले. तसेच प्राथमिक शिक्षक जयश्री कीर्तने, माध्यमिक शिक्षक सुनील कटारिया यांना प्रत्येकी पाच हजार रुपये,सन्मानचिन्ह, प्रमाणपत्र देऊन मान्यवरांच्या हस्ते गौरविण्यात आले. गणेश उत्साहात सामाजिक व सांस्कृतिक देखावे सादर करून समाज प्रबोधन करणाऱ्या शहरातील काही गणेशमंडळाना बक्षिसे देण्यात आली. यामध्ये प्रथम सुवर्णयुग तरुण मंडळ, द्वितीय श्रीराम तरुण मंडळ, तृतीय दोस्ती सामाजिक व सांस्कृतिक तरुण मंडळ, उत्तेजनार्थ नवोदय तरुण मंडळ, जय भवानी तरुण मंडळ यांना रोख रक्कम व सन्मान चिन्ह देऊन गौरविण्यात आले.
या कार्यक्रमास नगराध्यक्ष डॉ मृत्युंजय गर्जे, उपनागध्यक्ष बजरंग घोडके, माजी नगराध्यक्ष अभय आव्हाड, आदिनाथ महाराज शास्त्री, राम महाराज झिंजुर्के, भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष युवराज पोटे, नंदकुमार शेळके, माणिक खेडकर, दिनकर गर्जे,सोमनाथ खेडकर, मुख्याधिकारी वसुधा कुरणावळ, नगरसेवक प्रसाद आव्हाड, दुर्गा भगत, दीपाली बंग आदी उपस्थित होते.
