स्पर्धेच्या युगात गुणवत्ता व ज्ञानाला किंमत -सौ.निंबाळकर सत्यम कॉम्प्युटर्सस आयोजित
अहमदनगर (प्रतिनिधी)- नवीन तंत्रज्ञानात गुरफटून न जाता त्याचा आपल्या करिअरसाठी उपयोग करुन घेतला पाहिजे. स्पर्धेच्या युगात गुणवत्ता व ज्ञानाला किंमत प्राप्त झाली आहे. जग झपाट्याने बदलत असताना नवीन गोष्टींचा देखील स्विकार केला पाहिजे.
वैचारिक क्षमता वाढवून, आपल्या आपले ध्येय गाठण्याचे आवाहन न्यु आर्टस कॉमर्स अॅण्ड सायन्स महाविद्यालयातील बीसीएस व बीसीए विभाग प्रमुख सौ.निंबाळकर यांनी केले. दिल्लीगेट येथील सत्यम कॉम्प्युटर्सच्या वतीने महाविद्यालयीन युवक-युवतींसाठी घेण्यात आलेल्या प्रश्नमंजुषा व विविध मनोरंजनात्मक खेळाच्या स्पर्धेच्या बक्षिस वितरण प्रसंगी त्या बोलत होत्या. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून लेट्स अपचे सुहास रायकर उपस्थित होते.
संचालक रोहित शिंदे यांनी विद्यार्थ्यांना संगणकिय ज्ञानाबरोबर त्यांच्या कला गुणांना वाव मिळण्यासाठी सत्यम कॉम्प्युटर्सच्या वतीने घेण्यात येणार्या विविध उपक्रमाची माहिती प्रास्ताविकात दिली. या स्पर्धेत इन्सटिट्युटच्या विद्यार्थ्यांसह शहरातील महाविद्यालयीन युवक युवतींनी उत्सफुर्त सहभाग नोंदवून धमाल केला. या स्पर्धेचे बक्षिस वितरण सौ.निंबाळकर व रायकर यांच्या हस्ते झाले. कार्यक्रमाचे सुत्रसंचलन प्रितम मुनोत यांनी केले. उपस्थितांचे आभार स्वाती शिंदे यांनी मानले. या स्पर्धा यशस्वी करण्यासाठी प्रितम मुनोत, पुजा मुथा, राहुल परदेशी, अक्षय साळुंके, स्वाती शिंदे, धनश्री शिंदे यांनी परिश्रम घेतले.