कोथरूड परिसरात तरुणाची हत्या
पुणे : पुण्यातील कोथरूड परिसरातील आज, शुक्रवारी एका तरुणाची हत्या करण्यात आली. परिसरातील एका इमारतीत सुमारे 21 वर्षांच्या तरुणाचा मृतदेह रक्ताच्या थारोळ्यात पडलेला आढळून आला. मृतकाच्या डोक्यावर अवजड वस्तूने हल्ला केल्याच्या जखमा आहेत. सियाराम गोपी चौपाल (वय-21) असे मृतकाचे नाव आहे. घटनेची माहिती मिळताच कोथरूड पोलीस घटनास्थळी दाखल पोहचले असून अधिक तपास सुरू आहे.