Breaking News

औरंगाबादेत चलनी नोटा बदलून देण्याची बतावणी करणारे दोघे ताब्यात

औरंगाबाद / मुंबई, दि. 21, डिसेंबर - चलनी नोटांच्या बदली बनावट नोटा देतो अशी बतावणी करून लुटणा-या दोघांना औरंगाबाद रेल्वे स्थानक परिसरातून ताब्यात घेण्यात आले आहे. सय्यद गौस सय्यद मकदुम व शेख हैदर कादर असे या दोघांचे नाव आहे.


या दोघांकडून पोलिसांनी कोयता व नोटा ठेवण्याची पेटी जप्त करण्यात आली. तेलंगणा राज्यातील एक टोळी चलनी नोटांच्या बदली बनावट नोटा देतो, अशी बतावणी करत होती. समोरील व्यक्तीला संशय आला की चाकूचा धाक दाखवून त्या व्यक्तीला लुटण्याचा प्रकार केला जात होता. ही टोळी रेल्वे स्थानक परिसरात येणार असल्याची माहिती पो लिसांना मिळाली. त्यानुसार सापळा रचून पोलिसांनी या दोघांना ताब्यात घेतले. या दोघांनी नांदेड व निजामाबादमध्ये लोकांची फसवणूक करून त्यांना लुटल्याचीही माहिती तपासात समोर आली आहे.