Breaking News

‘यशोधन’मार्फत दाखल्यांच्या सुविधेसाठी जनसेवक


संगमनेर प्रतिनिधी - जुनमध्ये सुरु होणार्‍या नवीन शैक्षणिक वर्षांमध्ये विद्यार्थ्यांची व पालकांची गैरसोय होऊ नये, यासाठी १० वी आणि  १२ वी नंतर पुढील शैक्षणिक प्रवेशासाठी सेतूमधून आवश्यक असलेल्या विविध प्रकारच्या कागदपत्रांची पूर्तता करावी लागते. यावेळी विद्यार्थी आणि पालकांची प्रचंड धावपळ होते. हे ध्यानात घेऊन विद्यार्थी आणि पालकांच्या मदतीसाठी माजी शिक्षणमंत्री आ. बाळासाहेब थोरात यांच्या ‘यशोधन’ संपर्क कार्यालया मार्फत सुविधा उपलब्ध करुन दिली जाणं आहे, अशी माहिती जनसंपर्क अधिकारी नामदेव कहांडळ व अनिल सोमणी यांनी दिली.

आ. बाळासाहेब थोरात यांनी महसूलमंत्रीपदाच्या काळात विद्यार्थ्यांना शाळोतच सर्व दाखले देण्याची ऐतिहासिक योजना राबविली होती. या अंतर्गत सुमारे ८० लाख दाखल्यांचे वितरण झाल्याने या उपक्रमाची ‘लिम्का बुक ऑफ रेकॉर्ड’मध्ये नोंद झाली. तालुक्यातील विद्यार्थ्यांना नवीन वर्षांतील प्रवेशासाठी आवश्यक विविध कागदपत्रे सहज व लवकर मिळावी, यासाठी यशोधनमधील जनसेवकांमार्फत मदत केली जाणार आहे. विद्यार्थ्यांना उत्पन्नाचा दाखला, नॉनक्रिमिलेअर दाखला, रहिवासी (डोमेसाईल) दाखला, जातीचा दाखला, शेतकरी प्रमाणपत्र, राष्ट्रीयत्व प्रमाणपत्र जेष्ठ नागरिक, रेशनकार्डची कामे, दैनंदिन विविध दाखले, आरोग्य सेवा, बचतगट आदींसह नवीन शैक्षणिक वर्षांत प्रवेश घेण्यासाठी विद्यार्थ्यांना विविध प्रकारच्या शासकीय दाखल्यांसाठी हे जनसेवक मदत करणार आहेत.

या जनसेवकांमध्ये बाबासाहेब मालुंजकर {घुलेवाडी गण}, भारत भालेराव, गुंजाळवाडी गण, मारुती कोल्हे, धांदरफळ गट, केशव फड, निमोण गट, अमोल सातपुते, समनापूर गण, कैलास मोकळ, वडगांव पान गण, बाळासाहेब गायकवाड, तळेगांव गण, संजय केदार, साकुर गण, आणि अविनाश आव्हाड, आंभोरे गण आदींचा सामावेश आहे. महिला बचत गटासाठी सुनिता कांदळकर या काम पाहणार आहेत. विद्यार्थी व पालकांनी आवश्यक दाखल्याबांबत काही अडचण आल्यास ‘यशोधन’ कार्यालय {०२४२५-२२७३०३०३/०३} या क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन गोरख वर्पे यांनी केले आहे.