Breaking News

फॉर्म भरणारे तुपाशी अन् शेतकरी उपाशी!

शासनाने शेतकर्यांना कापसावर बोंडअळी झालेल्या पिकांबाबत अगोदर आँनलाईन फॉर्म भरण्यासाठी सांगितले होते. मात्र आता पिकांचे कृषि अधिकारी स्वत: त्या ठिकाणी जाउन पाहणी करणार आहेत. मात्र आँनलाईन फॉर्म भरण्यासाठी पळापळ व आटापिटा केला, रोजगार बुडवुन फाँम भरले त्यावर पैसा खर्च केला त्याचे काय, असा सवाल शेतकरी उपस्थित करत आहेत. 


दरम्यान, आँनलाईन फॉर्म भरण्यासाठी शेतकर्यांनी ईंटरनेटच्या दुकानात तोबा गर्दी केली. एक फॉर्म भरण्यासाठी तब्बल शंभर ते दिडशे रुपये खर्च केले. मात्र त्यामुळे आँनलाईन फाँर्म भरणार्या व्यवसायिकाला त्याची कमाई झाली. मात्र बळीराजाच्या पदरात अद्याप काहीच पडलेले नाही. त्यामुळे ‘फॉर्म भरणारे तुपाशी अन् शेतकरी उपाशी’ अशी परिस्थिती नगर तालुक्यात पाहायला मिळत आहे