Breaking News

आपल्या हक्काच्या पैशासाठी ठेवीदारांचे उपनिबंधकाला साकडे.

4 वर्षापासुन रावसाहेब पटवर्धन या पतसंस्थेचे ठेवीदार आपल्या हक्काच्या पैसे परत मिळण्यासाठी लध देत आहे. आता या रावसाहेब पटवर्धन ही पतसंस्था प्रवरा नागरी संस्थेमध्ये विलीन झाली आहे. प्रवरा नागरिक संस्था ही महाराष्ट्र राज्याचे विरोधी पक्षनेता राधाकृष्ण विखे पाटील यांच्या हातात असल्यामुळे या ठेवीदारांची विखे यांच्या अध्यक्षतेखाली बैठक झाली होती. त्यावेळी विखे बोलत असतांना ते ठेवीदांराना म्हणाले रावसाहेब पटवर्धन ही पतसंस्था आता प्रवरा नागरी संस्थेमध्ये वर्ग झाल्यामुळे तुमचे सर्वांचे पैसे जिवंत झाले आहेत. 


तुमचे पैसे तुम्हाला परत मिळतील यासाठी तुम्ही सर्वांनी धिर धरणे आवश्यक आहे, अशी माहिती बैठकीत उपस्थित रामदास महाराज क्षिरसागर यांनी दिली. सर्व ठेवीदारांच्या ठेवी कधी व कशाप्रकारे मिळतील याची माहिती देण्यात यावी या मागणीचे निवेदन सहाय्यक निबंधक हरिष कांबळे यांना दिले. 

याप्रसंगी रामदास महाराज क्षिरसागर, एम. आर. पठाण, कि. के. पडोळे, अ‍ॅड. झरेकर, बा. दौ. उगलमुगले, किसन शिंदे, जी.एस. कराळे, उत्तम टेपाळे, नौशाद शेख, एम. एम. मुन्शी, परशुराम जव्हेरी, सुवर्णा जव्हेरी, रतन पवार, सुदाम काळे, किसन कोतकर, हेमंत बोरसे, अलका बोरसे, शिवाजी शिंदे, मनोज पाठक, गुलाब शेख, शहनाज शेख, बबन कोतकर, रामकृष्ण परदेशी, रमेश घायतडक, विजया देशमुख, शकुंतला घायतडक, प्रमिला कुलकर्णी, सरला जाधव, हरिभाऊ काळे आदी उपस्थित होते.