Breaking News

अग्नितांडवाप्रकरणी पोलिसांकडून पाच जणांना अटक

मुंबई: लोअर परळ येथील कमला मिल्स कम्पाऊंडमधील मोजो बिस्त्रो रेस्टॉरंट अ‍ॅण्ड पबला लागलेल्या भीषण अग्नितांडवाप्रकरणी पोलिसांकडून पाच जणांना अटक करण्यात आली आहे. कमला मिल्स कम्पाऊंडमधील वन-अबव्ह पब आणि हॉटेल मोजोस ब्रिस्टोलला ही भीषण आग लागली होती. 



या प्रकरणी मालक अभिजीत मानकर, हितेश संघवी आणि जिगर संघवी या तिघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सदोष मनुष्यवध, बेजबाबदारपणा, निष्काळजीपणा, जिवितास कारणीभूत, अग्नी विरोधक यंत्रणा यानुसार गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.