पुण्यात हायप्राेफाइल सेक्स रॅकेट चालवणारी टाेळी उघड; महिलेसह दोघांना अटक
पुणे : पुण्यात पोलिसांनी हायप्रोफाइल सेक्स रॅकेटचा पर्दाफाश केला आहे. याप्रकरणी एजंट महिलेसह दोघांना अटक करण्यात आली आहे. तसेच एक उझबेकिस्तान, एक रशियन आणि एका भारतीय तरुणींना ताब्यात घेण्यात आले आहे. पुण्यातील बालेवाडी येथील एका पंचतारांकित हॉटेलसमोर ही कारवाई करण्यात आली. दरम्यान, हे रॅकेट मुंबई, पुण्यासह इतर शहरात काम करत असल्याचे पोलिसांनी सांगितले.
मधच रिकाडाे स्मिथ (रा. अंधेरी, मुंबर्इ) आणि साेनिया जीवनलाल बधवाना (रा. मुंबर्इ) अशी आरोपींची नावे आहेत. त्यांच्यासह एक भारतीय तरुणी, एक २७ वर्षीय उझबेकिस्तानची तरुणी आणि एका २५ वर्षांच्या रशियन तरुणीला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. अाराेपी महिलांविराेधात हिंजवडी पाेलिस ठाण्यात पिटा कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात अाला अाहे.
चाैकशीदरम्यान एजंट महिलाने आपण फ्रीलान्स इव्हेंट मॅनेजमेंटचे काम करत असल्याचे सांगितले. नव्याने माॅडेलिंग क्षेत्रात पर्दापण करणाऱ्या माॅडेल्स, स्ट्रगल करणाऱ्या माॅडेल तसेच अार्थिक अडचणीत सापडलेल्या माॅडेल यांच्याशी संपर्क साधून त्यांच्याकडून वेश्याव्यवसाय करून घेतला जाताे. व्यवसायात दलाल हे तारांकित हाॅटेललाच प्राधान्य देतात.