Breaking News

जिल्ह्यात अजूनही रस्त्यासाठी उपोषण !

सिधुदुर्गनगरी, दि. 22, डिसेंबर - सिंधुदुर्ग जिल्ह्यात अजूनही रस्त्यासाठी उपोषण करावे लागते, ही विचार करण्याची बाब आहे. दोडामार्ग तालुक्यातील मोर्ले पारगड कोल्हापूर मार्ग रस्त्यात येणारी झाडे महिनाभरात तोडून देण्याचे आश्‍वासन उपवनसंरक्षक समाधान चव्हाण यांनी न पाळल्याने मोर्ले पारगडवासीयांनी सावंतवाडी येथील उपवनसंरक्षक कार्यालयसमोर पुन्हा उपोषण सुरु केले. 


रस्त्यात येणारी झाडे न तोडल्याने रस्त्याचे काम सुरु होणे अशक्य आहे. ती तोडून रस्त्याचे काम सुरु करावे यासाठी महीनाभरापूर्वी मोर्ले येथे उपोषण करण्यात आले होते. पुन्हा त्यांनी हे उपोषण सावंतवाडी येथे पुकारले. वनविभाग सांगते आम्ही बांधकाम विभागाला परवानगी दिली आहे, पण उपोषण ठिकाणी बांधकाम आणि वनाधिकारी आणि उपोषणकर्ते याची बैठक झाल्याशिवाय हे उपोषण थांबणार नाही अशी परिस्थिती आहे.


दोडामार्ग तालुक्यातील पारगड-मोर्ले रस्त्यासाठी येतील ग्रामस्थांना वारंवार उपोषण करावी लागतात, बांधकाम आणि वनविभाग यांच्या कचाट्यात या रस्त्याचे काम रखडले आहे. वनविभाग आणि बांधकाम विभागाचे अधिकारी फक्त आश्‍वासने देतात. जो पर्यंत रस्त्यावरची झाडे तोडत नाही तोपर्यंत उपोषण न सोडण्याच्या निर्णय ग्रामस्थानी घेतला आहे. शिवकालीन वास्तू पारगड किल्ल्यावर जाणार्‍या या रस्त्याच्या 1980 साली रस्ता मजूर होऊन ही वेळ का आली असा ग्रामस्थांचा सवाल आहे?