क्रेडीट कार्डवर गिफ्ट मिळाल्याची बतावणी, तरुणाला 50 हजारांचा गंडा
पुणे, दि. 21, डिसेंबर - एसबीआय बँकेच्या क्रेडीट कार्डवर बक्षीस मिळाल्याची बतावणी करुन तरुणाची 50 हजार रुपयांची फसवणूक केल्याचा प्रकार समोर आला आहे. याप्रक रणी शिरूर पोलीस ठाण्यात अज्ञाताविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
शिरूर येथील रहिवाशी भरत चौधरी यांना तुमच्या एसबीआय बँकेच्या क्रेडीट कार्डवर गिफ्ट व्हाऊचर मिळाले असल्याचे एका अज्ञाताने निनावी फोनद्वारे कळविले. त्याकरता चौधरी यांच्याकडे त्याने घराचा पत्ता आणि बँक खात्याच्या माहितीकरता विचारणा केली.
त्यानुसार चौधरी यांनी त्याला मेसेज करुन माहिती पुरविली. मात्र, काही वेळाने आपल्या बँक खात्यातील 50 हजार रुपये काढण्यात आल्याचे चौधरी यांच्या निदर्शनास आले. फसवणूक झाल्याचे लक्षात येताच त्यांनी तत्काळ पोलीस ठाण्यात धाव घेतली. याप्रकरणी पो लिसांनी अज्ञाताविरोधात गुन्हा दाखल केला असून अधिक तपास पोलीस निरीक्षक कुंटे करीत आहेत.