सटाणा-मालेगाव रस्त्यावरील भीषण अपघात 7 प्रवासी जागीच ठार
नाशिक, दि. 29, डिसेंबर - सटाणा-मालेगाव रस्त्यावरील शेमळी नजीक आज पहाटे अज्ञात ट्रक व अॅपे रिक्षामध्ये झालेल्या भीषण अपघातात 7 जण जागीच ठार झाल्याची प्राथमिक माहिती मिळते आहे. अपघात पहाटेच्या सुमारास सुकड पुलाजवळ झाला.
अज्ञात ट्रकने अॅपे रिक्षाला क्रमांक एमएच 41 व्ही 1559 जोरदार धडक दिली. अपघातातील मृतांना वेळीच उपचार मिळाले नाहीत त्यामुळे मृतांची संख्या वाढल्याची चर्चा परिसरात आहे.याबाबत अधिक माहिती अशी की, सर्व मृत हे यात्रेतील खेळणी व्यावसायिक असल्याचे समजते. सटाणा मालेगाव रस्त्याची रुंदी नुकतीच वाढवण्यात आली आहे मात्र पूलाजवळ नेहमीच वाहतुकीला अडथळा निर्माण होतो अशी चर्चा परिसरात आहे.दरम्यान, स्थानिक नागरिक आणि पोलीस यंत्रणा याठिकाणी दाखल झाली असून छिन्न-विच्छिन्न अवस्थेतील मृतदेह सटाणा ग्रामीण रुग्णालयात आणण्यात आले.