Breaking News

शरद पवारांनी दत्तक घेतले 4 मल्ल.

मुंबई : माजी केंद्रीय मंत्री आणि महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषदेचे अध्यक्ष शरद पवार यांनी रविवारी चार मल्लांना दत्तक घेतले. दुहेरी राष्ट्रकुल सुवर्णपदक विजेता राहुल आवारे, राष्ट्रकुल सुवर्णपदक विजेता उत्कर्ष काळे, महाराष्ट्र केसरी अभिजित कटके आणि उपमहाराष्ट्र केसरी किरण भगत या पैलवानांना शरद पवारांनी तीन वर्षांसाठी दत्तक घेतले. 


या चारही पैलवानांच्या बाहेरील देशातील प्रशिक्षण, खुराक, राहणे या सर्वाचा खर्च स्वतः शरद पवार करणार आहेत. यातील अभिजित कटके हा पुण्यातील शिवरामदादा तालीमचा मल्ल असून किरण भगत, उत्कर्ष काळे आणि राहुल आवारे हे ऑलिम्पियन काका पवार यांच्या पुण्यातील आंतरराष्ट्रीय क्रीडा संकुलातील मल्ल आहेत. कुस्ती संघटना विविध उपक्रम राबवत असते. खेळाडू गुणवाण आणि होतकरू असतात मात्र, पैशांअभावी त्यांना कुस्तीपटू बनण्यात अडचणी येतात. यामुळे या चार मल्लांना पवारांनी दत्तक घेतले आहे. या तीन वर्षात या चौघांना मात्र कामगिरी उत्तम करावी लागणार आहे.