Breaking News

वैद्यनाथ दुर्घटना : मृतांची संख्या 4; मृतांच्या कुटुंबियांना 6 लाखांची मदत जाहीर

मुंबई, दि. 10, डिसेंबर - परळी येथील वैद्यनाथ साखर कारखान्यातील दुर्घटनेतील मृतांच्या संख्येत वाढ झाली असून संख्या 4 वर पोहोचली आहे. आज उपचारादरम्यान एकाचा मृत्यू झाला. दरम्यान ग्रामविकास मंत्री तथा कारखान्याच्या अध्यक्षा पंकजा मुंडे यांनी मृतांच्या कुटुंबियांची भेट घेतली. 


मृतांच्या कुटुंबियांना कारखान्यातर्फे तीन लाख, मुख्यमंत्री सहायता निधीतून दोन लाख रुपये आणि पंकजा मुंडे यांच्या वतीने वैयक्तिक एक लाख, असे एकूण सहा लाख रूपयांची आर्थिक मदत मिळणार आहे. तर जखमींना दीड लाख रूपयांची आर्थिक मदत देण्याची घोषणाही मुंडे यांनी यावेळी केली. दरम्यान, मृतांच्या कुटुंबातील एका व्यक्तीला कारखान्याच्या सेवेत सामावून घेणार असल्याचेही आश्‍वासनही त्यांनी दिले.
खा. प्रीतम मुंडे, कारखान्याच्या संचालिका अ‍ॅड. यशश्री मुंडे यांनीही लातूरमध्ये जाऊन जखमींची भेट घेतली व त्यांच्या प्रकृतीची विचारपूस केली. दुर्दैव घटनेत झालेल्या कर्मचार्‍यांच्या मृत्यूबद्दल त्यांनी हळहळ व्यक्त केली.