Breaking News

महिला विक्रेत्याला लुटण्याचा प्रयत्न करणा-या 2 महिला अटकेत

ठाणे, दि. 21, डिसेंबर - डोंबिवली पूर्वेकडील सांगर्ली येथील महिला विक्रेत्याला लुटण्याचा प्रयत्न करणा-या दोन महिलांना अटक करण्यात आली आहे. सुधा जाधव, मीनाक्षी गायकवाड अशी अटक केलेल्या महिलांची नावे आहेत. तर दोन महिला फरार झाल्या असल्याचे सांगण्यात येत आहे.


पीडित महिला विक्रेत्याचे डोंबिवली पूर्वेकडील बालाजी मंदिराच्या रोडवर कपड्यांचे दुकान आहे. चोरी करण्याच्या उद्देशाने चार महिलांची टोळी तिच्याजवळ आली. त्यांनी कपडे विक त घेण्याचा बहाणा करत कपडे विक्रेत्या महिलेला बोलण्यात गुंतवून कपड्यांचे बंडल, मोबाईल, पर्स, रोकड घेऊन तेथून पळून जाण्याचा प्रयत्न केला. महिलेच्या लक्षात ही बाब येताच तिने आरडाओरडा करायला सुरूवात केली. तिचा आवाज ऐकून आसपासच्या नागरिकांनी पळून जाणा-या महिलांना पकडून पोलिसांच्या ताब्यात दिले. याप्रकरणी पो लिसांनी गुन्हा दाखल केला असून अन्य 2 फरार महिलांचा शोध सुरू केला.