Breaking News

राहुल गांधी काँग्रेस अध्यक्षपदी : ठाण्यात काँग्रेस कार्यकर्त्यांचा जल्लोष


ठाणे, दि. 17, डिसेंबर - अखिल भारतीय काँग्रेस समितीच्या अध्यक्षपदी राहुल गांधी यांच्या बिनविरोध निवड झाल्याबद्दल ठाणे शहर जिल्हा काँग्रेस समितीच्या वतीने घोडागाडीतून नागरिकांना लाडू वाटप करून जल्लोष साजरा केला. यावेळी काँग्रेसचे ठाणे शहर जिल्हा अध्यक्ष मनोज शिंदे, प्रदेश काँग्रेस उपाध्यक्ष सुभाष कानडे,के वृषाली,बी एन सिंग,आदी सह मोठ्या संख्येने कार्यकर्ते यावेळी उपस्थित होते.