Breaking News

ऑलिम्पियाड स्पर्धेमध्ये आंतरराष्ट्रीय पातळीवर यशस्वी कामगिरी

अहमदनगर / प्रतिनिधी-केडगाव येथे नव्याने भरभराटीला आलेल्या पोदार इंटरनॅशनल स्कूलचे उद्दिष्ट विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासाबरोबर त्यांना स्पर्धा परीक्षेच्या दृष्टीने तयार करून घेणे असल्याचे, शाळेचे प्राचार्य मंगेश जगताप यांनी सांगितले. सायन्स ऑलिम्पियाड फाउंडेशन च्या स्पर्धेमध्ये संपूर्ण भारतातून व इतर देशातून लाखो विद्यार्थी भाग घेत असतात.


 इंटरनॅशनल जनरल नॉलेज स्पर्धेमध्ये लाखो स्पर्धकांमधून मोहम्मद साद पठान (इयत्ता 1 ली) झोनल पदवी स्थान 2 व आंतरराष्ट्रीय 3, वेदान्त झावरे झोनल पदवी स्थान 3 व आंतरराष्ट्रीय 7, संस्कृती दळवी झोनल पदवी स्थान 8 व आंतरराष्ट्रीय 14, यथार्थ चव्हाण, झोनल पदवी स्थान 8, वेदिका दिघे झोनल पदवी स्थान 8 व आंतरराष्ट्रीय 10, इषीता गुंजाळ झोनल पदवी स्थान 16 असा उत्कृष्ट निकाल लागला. या विद्यार्थ्यांना 1000 रुपयांचे बक्षीस, सुवर्ण पदक, चांगली कामगिरी केल्याबद्दल गुणवत्ता प्रमाणपत्र सायन्स ऑलिम्पियाड फाउंडेशन मार्फत देण्यात येणार आहे. तसेच नॅशनल इंग्लीश ऑलिम्पियाड स्पर्धेमध्ये हजारो विद्यार्थ्यामधून इयत्ता दुसरीमधून यश दळवी व संस्कृती दळवी यांना झोनल पदवी स्थान व आंतरराष्ट्रीय पदवी स्थान 9 व अंजली जगताप हिला 21 वे स्थान मिळाले. नुकत्याच पार पडलेल्या सायन्स ऑलिम्पियाड स्पर्धेमध्ये लाखो विद्यार्थ्यांमधून वेदिका दिघे (इयत्ता 1 ली) हिला आंतरराष्ट्रीय 3 रे स्थान, अंजली जगताप व अथर्व बोठे (इयत्ता 2 री) यांना आंतरराष्ट्रीय 4 थे स्थान, कलश शाह (इयत्ता 1ली ) आंतरराष्ट्रीय 5 वे स्थान, वेदान्त झावरे (इयत्ता 2 री) यास आंतरराष्ट्रीय 9 वे स्थान, स्वरा तांबे (इयत्ता 1 ली) हिला आंतरराष्ट्रीय 12 वे स्थान तसेच यश दळवी यास 16 वे स्थान प्राप्त झाले. या विद्यार्थ्यामध्ये अंजली जगताप व अथर्व बोठे यास 1250 रुपये रोख बक्षीस सुद्धा देण्यात येणार आहे व त्यांच्याबरोबर बाकीच्या काही विद्यार्थ्यांना 1000 रुपयाचे बक्षीस, सुवर्ण पदक, आंतरराष्ट्रीय पातळीवर चांगली कामगिरी केल्याबद्दल उत्कृष्ट गुणवत्ता प्रमाणपत्र व विभागीय पातळीवर उत्कृष्ट कामगिरी पदक सायन्स ऑलिम्पियाड फाउंडेशन मार्फत देण्यात येणार आहे. गुणवंत विद्यार्थांचे अभिनंदन व कौतुक शाळेचे प्राचार्य मंगेश जगताप व शाळेतील इतर सर्व शिक्षक व पालकांनी केले.