Breaking News

अपघाताने सापडला १५०० वर्षांपूर्वीचा खजिना.

लंडन येथील रहिवासी असलेल्या क्रिस कटलरने एका शेतात १५०० वर्षांपूर्वीचा खजिना शोधून काढला आहे. कटलरने हा खजिना ४ दिवस १७ हजार चौरस फुटांचे शेत मेटल डिटेक्टरने चाळून शोधून काढला आहे. ॲग्लो सॅक्सन राजाच्या काळातील हा खजिना असून अशा प्रकारची नाणी राजा किंवा शाही घराण्याच्या सदस्यांच्या मृत्यूनंतर ताबूतासह पुरली जात होती. 


या खजिन्याची किंमत जवळपास १ कोटीच्या घरात असून एसेक्स येथील १७ हजार चौरस फुटांच्या शेतात खजिना असू शकतो, असा अंदाज त्याने लावला होता. चार दिवसांच्या मेहनतीनंतर त्याला आपल्या मेटल डिटेक्टरवर तेथील धातूचा संकेत मिळाला. खोदून पाहिल्यानंतर काही धातूचे तुकडे त्याच्या हाती लागले.

धूळ पुसून पाहिल्यावर ते सोन्याचे नाणे असल्याचे त्याच्या लक्षात आले. त्यानंतर कटलरने त्या ठिकाणी आणखी खोदकाम केले असता, तशाच प्रकारची २५ नाणी त्याला सापडली. ब्रिटनच्या कायद्यानुसार, सापडलेल्या वस्तू ३०० वर्षे जुन्या आणि त्यातील १० टक्के वस्तू सोन्याच्या असल्यास त्यालाच खजिना असे संबोधले जाते. सध्या हा खजिना ब्रिटनच्या हिस्ट्री म्युझियमला पाठवण्यात आला आहे. पुरातत्त्ववेत्ता त्याचा सविस्तर तपास करून अंतिम किंमत आणि त्यानंतर रक्‍कम वाटण्याचा निर्णय घेणार आहेत..