दिल्लीगेट वेस हायमॅक्सच्या गराड्यात ! दिल्लीगेट येथील रस्त्यांच्या कामांना खासदारांनी प्राधान्य द्यावे.
शहरामध्ये दोनच वेशी शिल्लक असल्याचे पहावयास मिळते. यातील दिल्लीगेट वेस आणि माळीवाडा वेस यांना पोस्टर आणि हायमॅक्सने वेढले आहे. शहरातील ऐतिहासिक वेशीचे अस्तित्वच आहे की नाही अशी परिस्थिती निर्माण झालेली आहे. तसेच यातुन नेत्यांची ही मानसिकता काय आहे याचे कुण्या जोतिष्याने सांगण्याची गरज नाही. दिल्लीगेट वेशीचा परिसर उजळून निघणार असला तरी यातुन वेशीच्या सौंदर्याला तडा पोहचणार आहे याचे भानच विकासाच्या ठेकेदारांना राहिले नाही.
खासदार निधीचा गैरवापर - गिरीष जाधव
बील वाढतंय...भरायचे कोणी ? - शेख
शहरातील पाणीपुरवठा आणि ट्रिट लाईटचे बिले भरण्यासाठी मनपाकडे पैसे नाहीत. यातच विजबिजाचा बोजा मनपावर पडला आहे.असे हायमॅक्स लावण्यापेक्षा शहरामधील इतर विविध कामे महत्त्वाची असतानाही सर्वच नेते याकडे दुर्लक्ष करत आहेत.सर्वसामान्यांच्या करांमधून मिळणारा पैसा हा अनेकदा व्यर्थ जात असल्याचे चित्र दिसत आहे. सध्या मनपाची परिस्थिती अतिशय बिकट असून यातून बील भरण्यापेक्षा रस्त्यांच्या कामासाठी नेत्यांनी आपला निधी खर्च करावा अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते शाकीर शेख यांनी केली आहे.
शहरातील दोन वेशीही सांभाळणे आता महानरपालिकेला अवजड होतच चालले आहे की काय असाच प्रश्न या निमित्ताने सर्वांना पडला आहे. याविषयी बोलताना मनसेचे गिरीष जाधव यांनी सांगितले की, दिल्लीगेट येथील रस्त्याच्या कामालाही खासदारांनी प्राधान्य द्यावे.
शहरातील अस्तित्वात असलेल्या अनेक वेशीपैकी दिल्लीगेट हे नगरकरांचे नाक म्हणूनच गणली जाते. शहर व उपनगराला जोडणारी ही वेस व नागरीकांच्या दैनंदिन कामासाठी याच वेशीमधुन प्रवास करावा लागतो. ही वेस कही अतिक्रमणाने वेढलेली असते तर कधी पोस्टर बाजीने सजलेली असते. यातुन आता ही वेस आहे की नेत्यांच्या जाहिरातीचे प्रतिक हेच समजेनासे झाले आहे.
खासदार दिलीप गांधी आणि उपमहापौर यांचा प्रयत्न निश्चित चांगला असला तरी तो नगरकरांना न पटणार आहे. तसेच खा.गांधी यांनी शहरातील इतर भागात लखलखाट करावा, वेशीचे आजपर्यंत सुशोभीकरणाचे काम न करणार्यांनी वेशीपाशी लखलखाट करण्याचे काम करु नये तसेच या वास्तुला इजा पोहचेल असे काम करु नये अशीच अपेक्षा नगरकरांची आहे.
...नंतर मेटनन्स कोणी करायचा - चव्हाण
खासदार निधी, आमदार निधीमधून वेळोवेळी विविध ठिकाणी हायमॅक्स बसविण्यात येतात. परंतु याची देखभाल करण्याची जबाबादारी कोणी स्विकारायची असाच काहीसा प्रश्न शहरात उपस्थित होत आहे. ज्या ज्या ठिकाणी खासदार आणि आमदार यांनी निधी दिला त्यातील किती ठिकाणी मेंटनन्स केला जातो. याचा शोध सर्वांनी घ्यावा असे आवाहन काँग्रसेचे दीप चव्हाण यांनी केले आहे.
शहरातील रस्त्यांचाही विचार व्हावा - शिंदे
शहरातील विकास म्हणजे लाईटचे एलएडी दिवे लावणे नव्हे. शहरात इतरही कामे असून त्याकडे खासदारांनी लक्ष देणे गरजेचे आहे, शहरातील दिल्लीगेटसह इतर भागात रस्त्याचा प्रश्न जटील असून खासदार यांनी इतर रस्त्यांच्या कामांसाठी निधी द्यावा. तसेच विकास आराखडा तयार करुन रस्त्यांची कामे मार्गी लावावीत असे मत शिवसेनेचे नगरसेेेवक अनिल शिंदे यांनी व्यक्त केले आहे.

शहरात अनेक प्रश्न प्रलंबीत असतानाही अनेकदा खासदर त्या प्रश्नांकडे कानाडोळा करताना दिसतात. मात्र त्यांनी हायमॅक्स लावण्याचे जे काम सुरु केले आहे. त्यासाठी आयएसओ कंपनीचे हायमॅक्स लावले आहेत का ? यासाठी कोणत्या कंपनीचे कोटेशन मागीतले होते याचे उत्तर द्यावे. तसेच सध्या शहरातील दिल्लीगेट भागातील रस्ता पुर्णपणे उखडला असतानाही त्याकडे दुर्लक्ष करत खासदारांनी आपला निधी हा दिल्लीगेटच्या कामाला लावणे गरजेचे होते मात्र दिवे असतानाही हायमॅक्स लावण्याचा घाट कशासाठी असा सवाल गिरीष जाधव यांनी केला आहे.
बील वाढतंय...भरायचे कोणी ? - शेख
शहरातील पाणीपुरवठा आणि ट्रिट लाईटचे बिले भरण्यासाठी मनपाकडे पैसे नाहीत. यातच विजबिजाचा बोजा मनपावर पडला आहे.असे हायमॅक्स लावण्यापेक्षा शहरामधील इतर विविध कामे महत्त्वाची असतानाही सर्वच नेते याकडे दुर्लक्ष करत आहेत.सर्वसामान्यांच्या करांमधून मिळणारा पैसा हा अनेकदा व्यर्थ जात असल्याचे चित्र दिसत आहे. सध्या मनपाची परिस्थिती अतिशय बिकट असून यातून बील भरण्यापेक्षा रस्त्यांच्या कामासाठी नेत्यांनी आपला निधी खर्च करावा अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते शाकीर शेख यांनी केली आहे.
रस्त्यांचे आणि दिव्यांचे ऑडिट व्हावे
शहरात किती पोल आहेत ? शहरातील पोलवर व हायमॅक्स दिव्यांच्या पोलवर किती दिवे आहेत? लावलेले दिवे आयएसओ दर्जाचे आहेत का? आदींचा अभ्यास करण्यात यावा. तसेच शहरातील रस्त्यांना एखाद्या व्यक्तीचे किंवा महापुरुषांचे नाव देण्यासाठी जसा ठराव महानगरपालिकेत केला जातो त्याप्रमाणे शहरातील हायमॅक्स विषयी मनपा सभेत ठराव व्हाव. तसेच वर्षाला या कामाचे ऑडीट व्हावे. रस्त्याचे आणि दिव्यांचे वर्षात एकदा तरी ऑडिट करण्यात यावे अशी मागणी आता समाजसेवकांकडून जोर धरु लागली आहे.