श्रीगोंदा तहसील कार्यालयासमोर वृक्षारोपन
श्रीगोंदा तहसील कार्यालयाच्या आवारात बाळासाहेब पानसरे यांनी मांडलेल्या संकल्पनेतून तहसीलदार व पत्रकार यांच्या संयुक्त विद्यमाने आज तहसील कार्यालयासमोर विविध प्रकारचे वृक्षारोपन करण्यात आले.
श्रीगोंदा तालुक्यातील काष्टी या ठिकानचे बाळासाहेब पानसरे यांनी तहसीलदार महेंद्र माळी यांच्याकडे तहसील कार्यलया समोरच्या आवारात वृक्षरोपन करण्याचा संकल्प सुचवला. त्यावर तहसीलदार महेंद्र माळी यांनी प्रतिसाद देत त्या संकल्पाला हिरवा कंदिल दाखविला.
25 नोव्हेंबर रोजी सकाळी 11 च्या सुमारास तहसील कार्यालयाच्या प्रांगणात झाडे लावण्यासाठी आखणी करून जे सी बी यंत्राच्या साह्याने खड्डे खोदण्यात आले. त्यामध्ये काळी माती शेण खत भरून 15 फूट उंची असनारी 3 वर्ष वयाची झाडे त्यामध्ये टाबुबिया डॅनीकडा पेलट्रॉफॉरम अशी फुले आणि सावली देणारी सुमारे 500 रु किमतीची 157 झाडे अल्पदरात देऊन त्याची लागवड केली आहे.
या कार्यक्रमात तहसीलदार महेंद्र माळी, नायब तहसीलदार गायकवाड, मंडळ अधिकारी निलेश वाघमारे, घोरपडे नगरसभा आंदोलनाचे राष्ट्रीय अध्यक्ष राजेश डांगे, तसेच बाळासाहेब पानसरे तसेच पत्रकार बंधू मध्ये दादा सोनवणे ,प्रा बळे दत्ता पाचपुते, सुभाष शिंदे शिवाजी साळुंके ,उत्तम राऊत, समिरण नागवडे, अर्षद शेख , सुहास कुलकर्णी मछिंद्र सुद्रीक आदी मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते