Breaking News

जाहिरातींमधील दिशाभूल आता कायद्याने रोखणार.

नवी दिल्ली : केवळ मार्केटिंग करणे व विक्री वाढवण्यासाठी प्युअर, रिअल, ओरिजिनल, नॅचरल, प्रोबायोटिक, झीरो शुगर आदी प्रकारचे शब्द वापरत ग्राहकांना आकर्षित करणे व त्यांची दिशाभूल करणाऱ्या तसेच अवास्तव दावे करणाऱ्या कंपन्यांना आता अशा जाहिराती करणे महागामध्ये पडणार आहे. याचे कारण, अशा प्रकारच्या खोट्या दाव्यांवर आधारित असलेल्या उत्पादनांची जाहिरात केल्यास कायदेशीर कारवाई केली जाणार आहे.

केवळ इतकेच नव्हे, तर एखाद्या उत्पादनाद्वारे व त्यात वापरलेल्या घटकांमुळे कोलेस्ट्रॉल, हृदयरोग आदी आजार बरे होतात, असा दावा केला गेला असेल, तर तो संबंधित प्रमाणकांच्या आधारावर सिद्ध करावा लागणार आहे. मग ती जाहिरात टीव्हीवर असो, वृत्तपत्रांमध्ये असो किंवा रेडियोवर असो. जर एखाद्या उत्पादनाच्या विक्रीवृद्धीसाठी अनावश्यक विशेषणादी शब्द व माहितीचा आधार देत जाहिरातीतून प्रसारित केले गेले व त्या बाबी प्रमाणकांवर आधारित नसल्या, तर त्या कंपनीविरोधातल कायदेशीर कारवाई केली जाणार आहे.


ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी दैनिक लोकमंथन चे फेसबुक पेज लाईक आणि ट्विटर वर फॉलो करा