केडगावमधील जोशी हॉस्पिटल मध्ये राडा !
अहमदनगर प्रतिनिधी :- केडगाव मधील जोशी हॉस्पिटल मध्ये जखमी पेशंट सोबत आलेल्या मित्रांनी धिंगाणा घालत घालत बरीच मोड तोड केली आणि तेथील कर्मचाऱ्यांशी शिवीगाळ करण्याची घटना काल रात्री १० च्या सुमारास घडली.
अभिजित काळे यास कसलासा मार लागला असताना रात्री १० च्या सुमारास त्याला उपचारासाठी त्याच्या दोन मित्रांनी ( नाव माहित नाही) केडगावमधील जोशी हॉस्पिटल ( अंबिका नर्सिंग होम) मध्ये आणले. रात्र पाळीस काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांनी त्यास थोडा वेळ बसण्यास सांगितले. याचा राग येऊन या तिघांनी त्या कर्मचाऱ्यांस शिवीगाळ केली.

हॉस्पिटल मधील फोन, घड्याळ, खिडकीच्या काचा, इंटरकॉम सुविधा, पेशंटला बसण्याचे बाकडे आदींची तोडफोड केली. आणि तेथील महिला कर्मचाऱ्यांशी शिवीगाळ करून निघून गेले. याबाबत डॉ. आशुतोष जोशी यांनी कोतवाली पोलीस स्टेशन मध्ये फिर्याद दाखल केली असून या तिघांविरुद्ध प्रोव्हिशन ऑफ व्हायरस अँड डॅमेज ऑर लॉस टू प्रॉपर्टी ऍक्ट २०१७ च्या कलम ३ प्रमाणे गुन्हा नोंदवण्यात आला आहे.